Headlines

एमपीएससी सुधारणा समितीच्या सचिवपदी मुंढे- मंत्री शिवेंद्रराजे:आ. राेहित पवार यांच्याशी चर्चेनंतर पुण्यात घाेषणा




एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशी, सुधारणा समिती सचिवपदी आयएएस तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निरोपानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी ही मोठी घोषणा केली. आमदार रोहित पवार आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यात झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती झाली आहे. तसेच निवृत्त पोलिस लखीम गौतम, माजी न्यायाधीश धनेश पाटील व पी. डी. नाईक यांचा समितीत समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *