Headlines

एरंडोल मतदारसंघात ‘जलतारा’अभियानातर्गंत‎ बारा गावांचा पायलट प्रकल्पात केला समावेश‎:खडकेसीम, वाघरे,आंचळगाव येथे जलसंवर्धनाच्या कामांना प्रारंभ



विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ अभियानाच्या पायलट प्रकल्पाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या पुढाकारातून एरंडोल

.

या अभियानाचा उद्देश पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे हा आहे. पायलट प्रकल्पासाठी १२ गावांमध्ये होणार कामे होणार आहेत.

अभियानाच्या प्रारंभानिमित्त खडकेसीम येथे सकाळी १० ते दुपारी १२, वाघरे येथे दुपारी १ ते ३ आणि आंचळगाव येथे सायं. ४ ते ६ या वेळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. आमदार ॲड. अमोल पाटील यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. या गावांतील नाले, नैसर्गिक जलप्रवाह, पाणलोट क्षेत्र, शेतीची स्थिती आणि भूजल पातळीचा अभ्यास करून जलसंवर्धनासाठी योग्य ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. संभाव्य स्थळांची जीपीएस नोंद करून तांत्रिक निकष व स्थानिक गरजांनुसार कामांचे नियोजन करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *