Headlines

मोठ्या अपघाताची वाट पाहू नका; शिंगवे तुकाई फाट्यावर सुरक्षा उपाययोजना करा




सोनई छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावरील शिंगवे तुकाई गावाच्या फाट्यावर दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी गतिरोधक उभारण्यासह स्पष्ट दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिंगवे तुकाई गावाकडे जाणारा रस्ता महामार्गाला जोडला जातो. या फाट्यावरून गावाकडे जाणाऱ्या वाहनांसह महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ असते. परिसरातील एमआयडीसीमध्ये कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगारांची आणि वाहनांची संख्या वाढल्याने या ठिकाणी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना फाट्याचा अंदाज वेळेत यावा, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ठळक दिशादर्शक फलक बसविणे आवश्यक आहे. तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार योग्य सुरक्षा उपाय करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, मागील महिन्यात या फाट्याजवळ अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वाहनांचा वेग यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली जात आहे. शिंगवेतुकाई फाटा येथे गतिरोधक नसल्याने अपघातग्रस्त झालेली दुचाकी. ‘मोठ्या अपघाताची वाट कशाला पाहता?’ “मागील महिन्यात एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मोठ्या अपघाताची वाट न पाहता संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात.” — सतीश थोरात, माजी सरपंच, शिंगवे तुकाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *