युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्लीत आले नाही तर यापुढे कोणतीही निवडणूक पक्षाकडून लढवता येणार नाही, पदावर राहता येणार नाही अशा धमक्या देत दिल्लीत येण्यासाठी सांगितले जात आहे, राहुल गांधी यांच्या पक्षात ही हुकुमशाही सुरू आहे, असा आरोप भाजप प्रवक्त
.
नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या हुकुमशाही आंदोलनलात सहभागी झाला नाहीत तर तुम्हाला यापुढे पक्षाकडून निवडणूक लढता येणार नाही, अशा धमक्या युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा सांगत आहेत. म्हणून विश्चजीत कदम यांनी काल पुण्यातील आंदोलन अर्धवट सोडून दिल्ली गाठली असावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काँग्रेसमध्ये काम करायचे असेल, निवडणूक लढवायची असेल किंवा पद हवे असेल तर दिल्लीत यावेच लागेल अशी धमकी देणं म्हणजे कार्यकर्त्यांचा राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही असे यातून दिसून येते.
महाराष्ट्रातील नेते हुकुमशाही सहन करणार?
नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रातील तरुणांना आणि युवक काँग्रेसच्या लोकांना धमक्या का दिल्या जात आहे याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले पाहिजे. लोकांना धमक्या देत दिल्लीमध्ये घेऊन जायचे आहे का? राहुल गांधी यांच्या पक्षात सुरू असलेल्या हुकुमशाहीचा ऑडिओ क्लिप समोर आली आहे. तुमचे दिल्लीतील पदाधिकारी महाराष्ट्रातील नेत्यांना धमक्या देतो. ही हुकुमशाही तुम्ही सहन करणार का हा माझा महाराष्ट्रातील नेत्यांना सवाल आहे. यावर राहुल गांधी आणि युवक काँग्रेसच्या लोकांनी स्पष्टीकरण द्यावे.

राहुल गांधींना अराजकता निर्माण करायचीय
नवनाथ बन म्हणाले की, देशात बांगलादेश, श्रीलंका, नेपाळसारखी परिस्थिती यावी आणि अराजकता निर्माण व्हावी यासाठी राहुल गांधी यांचे षड्यंत्र आहे. कदाचित संपूर्ण देशभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अशाच धमक्या दिल्या गेल्या असतील. आंदोलनाला गर्दी जमत नाही म्हणून पदाधिकाऱ्यांना धमक्या देत बोलवत असाल तर तुमची केवीलवाणी अवस्था झाली आहे.
नवनाथांचे नामस्मरण केल्याने विवेक जागा झाला
नवनाथ बन म्हणाले की, पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी पहिलेच मान्य केल्या होत्या पण तरीही काही लोकांनी आंदोलन सुरू केले. काल शिवेंद्रराजे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. पण या आंदोलनाचा आणि भीमनवार यांचा काहीही संबंध नव्हता. ते अध्यक्ष असताना कोणताही पेपर फुटला नव्हता. पण त्यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करत होते तरीही आंदोलन झाले. दुर्दैवाने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाले पण ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना शुभेच्छा. परंतू देवेंद्र फडणवीस कायम विद्यार्थ्यांच्या सोबत होते, आहेत आणि राहतील. पुण्यातील आंदोलनात पुन्हा एकदा माझ्यावर टीका करण्यात आली. चार दिवस नवनाथांचा गजर तिथे सुरू होता. त्या नामस्मरणाचा परिणाम काय झाला तर त्यांना मी हभप नवनाथ महाराज बन वाटायला लागलो. त्यांनी नाथाचा गजर केल्याने त्यांचा विवेक जागा झाला.
हे ही वृत्त वाचा संजय राऊतांचा थेट सरन्यायाधीशांना सवाल:लंडनमध्ये नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळता, डिनर पार्ट्यांना जाता; मग राहुल गांधींना भेटायला CJIचे दरवाजे बंद का?

“देशातील लोकशाही आणि संविधानाची उघड लूट सुरू असताना, न्याय मागणारे सर्व संविधानिक मार्ग बंद झाले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील शिष्टमंडळासह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची भेट मागितली होती. सुरुवातीला वेळ देऊन नंतर अचानक ‘राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही’ असे सांगत सरन्यायाधीशांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. 80 हून अधिक न्यायाधीश लंडनमध्ये जाऊन राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात, मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्ट्यांना हजेरी लावतात, तेव्हा चालते; मग देशातील कोट्यवधी जनतेच्या वतीने मतचोरीचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते आले तर दरवाजे का बंद करता? हा इतिहास सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेची नोंद नक्की ठेवेल,” असा स्फोटक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर