![]()
श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका देवी मंदिरात बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘शब्दे अधिष्ठिली नवरात्री’ या विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आदिशक्तीच्या चरणी काव्यरूपी सेवा अर्पण क
.
या कवी संमेलनात पुणे येथील प्राजक्ता पटवर्धन, परभणी येथील सीमंतिनी कुंडीकर, नांदेड येथील अतुल टेळकीकर, माहूरगड येथील स्वाती मिनेश आणि नांदेड येथील महेश मोरे सहभागी होणार आहेत. आपल्या काव्यरचनेतून हे कवी आदिशक्तीचा महिमा, भक्तिभाव आणि शब्दसाधनेचा अनुभव रसिकांसमोर मांडणार आहेत.
‘या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता’ या देवीस्तुतीच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेले हे संमेलन नवरात्रोत्सवाला साहित्यिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची जोड देणारे ठरणार आहे. देवीच्या भक्तीबरोबरच मराठी कवितेचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्ताने काव्यरसिकांना मिळणार आहे. या काव्योपासनेचा लाभ घेण्यासाठी साहित्यप्रेमी आणि भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रेणुका देवी संस्थान, माहूरगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.