![]()
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी काही पुरुष पोलिसांकडून मुली व महिलांना धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप केला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका गाडीत खाकी वर्दी असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत राऊत यांनी म्हटले की, ज्या पोलिसांना रस्त्यावर गुंडागर्दी करताना पाहिले, महिला मुलींवर हात टाकताना दिसले, ते भाजपचे (अमित शहा) नकली पोलिस होते. भाडोत्री गुंडांना खाकी गणवेश देऊन आंदोलकांना रोखण्यासाठी उतरवले होते, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच पुढे संजय राऊत म्हणाले, दिल्लीत आंदोलनाच्या आसपास खाकी पोलिस वर्दीने गच्च भरलेल्या गाड्या होत्या, कोणासाठी? नेमप्लेटशिवाय जे पोलिस दिसत होते ते अशी वर्दी घातलेले गुंड होते. हाच राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पॅटर्न आहे. उघडा डोळे आणि बघा नीट, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ही देखील बातमी वाचा.. संजय राऊतांचा थेट सरन्यायाधीशांना सवाल:लंडनमध्ये नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळता, डिनर पार्ट्यांना जाता; मग राहुल गांधींना भेटायला CJIचे दरवाजे बंद का? “देशातील लोकशाही आणि संविधानाची उघड लूट सुरू असताना, न्याय मागणारे सर्व संविधानिक मार्ग बंद झाले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील शिष्टमंडळासह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची भेट मागितली होती. सुरुवातीला वेळ देऊन नंतर अचानक ‘राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही’ असे सांगत सरन्यायाधीशांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. 80 हून अधिक न्यायाधीश लंडनमध्ये जाऊन राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात, मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्ट्यांना हजेरी लावतात, तेव्हा चालते; मग देशातील कोट्यवधी जनतेच्या वतीने मतचोरीचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते आले तर दरवाजे का बंद करता? हा इतिहास सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेची नोंद नक्की ठेवेल,” असा स्फोटक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
Source link
दिल्लीत पोलिसांच्या वेशातील भाडोत्री गुंड?:संजय राऊतांचा गंभीर आरोप, भाजपचे (अमित शहा) नकली पोलिस म्हणत टीका