“पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार रोहित पवार यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि पुनर्वसनासाठी हे आंदोलन उभे केले होते. एमपीएससी ही संविधानाने निर्माण केलेली स्वायत्त संस्था आहे. संविधानाच्या कलम 317
.
रोहित, छात्र तुम्हारी खेती नही…; वात्रटिका सादर करत पवारांवर प्रहार
रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवर सडकून टीका करताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या रोहित पवारांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ केला. विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्यांपेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवणे हाच या आंदोलनामागील छुपा अजेंडा होता.”
पत्रकार परिषदेत आपल्या खास शैलीत निशाणा साधताना त्यांनी, “रोहित, छात्र तुम्हारी खेती नही…” अशी वात्रटिका सादर करत, “विद्यार्थी म्हणजे कोणाची जहागिरी किंवा शेती नाही की त्यांच्या जीवावर राजकारण करावे,” असा जोरदार टोला लगावला.
कलम 317चा नियम विसरलात का?; तुकाराम मुंढे अध्यक्षांना नोटीस काढू शकत नाहीत
आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावरील कारवाई आणि चौकशी समितीच्या वैधतेवर त्यांनी तांत्रिक बोट ठेवले. “भारतीय संविधानातील कलम 317 नुसार, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची चौकशी राज्य सरकार किंवा त्यांनी नेमलेली कोणतीही प्रशासकीय समिती परस्पर करू शकत नाही. ही प्रक्रिया केवळ भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भानुसारच होऊ शकते. राज्य सरकारने समितीवर नेमलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे घटनात्मकदृष्ट्या एमपीएससी अध्यक्षांना थेट कोणतीही नोटीस पाठवू शकत नाहीत किंवा त्यांची चौकशी करू शकत नाहीत.”
भीमनवारांना राजकीय आकसातून लक्ष्य केले
“ज्या जुन्या परीक्षांच्या काळातील गैरप्रकारांचा बागुलबुवा केला जात आहे, त्या काळात विवेक भीमनवार हे अध्यक्षपदावर कार्यरतही नव्हते. तरीही केवळ राजकीय हट्टापायी एका सनदी अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवण्यात आले,” असा दावा सदावर्ते यांनी केला.
शांतता क्षेत्राचा भंग करून रुग्णवाहिका अडवल्या
आंदोलनाच्या जागेवर आक्षेप घेताना त्यांनी पुणेकरांच्या झालेल्या गैरसोयीचा पाढा वाचला. “पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ दोन स्मशानभूमी, ब्लड बँक आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासू अभ्यासिका आहेत. अशा संवेदनशील शांतता क्षेत्रात (Silent Zone) विनापरवाना रस्ता अडवून आंदोलन करण्यात आले. केवळ प्रसिद्धीसाठी गर्दी जमवून रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांची ये-जा रोखण्यात आली. अशा पद्धतीने रस्ते अडवून सामान्यांना वेठीस धरणे लोकशाहीत बसत नाही.”
ठाकरे कुटुंबातील तरुणांवर आणि राजकीय स्टंटबाजीवर टीका
आंदोलनाच्या मंचावर हजेरी लावणाऱ्या विरोधी नेत्यांवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, “स्वतःकडे कोणतेही स्वतंत्र जनआंदोलन उभे करण्याची ताकद उरलेली नसल्याने ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीला या आंदोलनाच्या खांद्यावर बसवून पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याची ही धडपड पूर्णपणे फसली आहे.”
रस्ते अडवणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, पासपोर्ट जप्त करा!
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी राज्य सरकारकडे आग्रह धरला. “दिल्लीत असो वा महाराष्ट्रात, संविधानाच्या नावाखाली रस्ते अडवून सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कथित आंदोलकांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.”
पासपोर्ट जप्तीची मागणी
“वारंवार सार्वजनिक शांतता धोक्यात आणून व्यवस्था वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि अशा समाजकंटकांचे पासपोर्ट तात्काळ जप्त करण्याची कायदेशीर तरतूद सरकारने करावी,” अशी आग्रही मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शेवटी केली.
———————————————————
हेही वाचा…
दिल्लीत पोलिसांच्या वेशातील भाडोत्री गुंड?: संजय राऊतांचा गंभीर आरोप, भाजपचे नकली पोलिस म्हणत टीका

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी काही पुरुष पोलिसांकडून मुली व महिलांना धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप केला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी