Headlines

Nitesh Rane Slams Thackeray Over Rohingya Names In Voter List


प्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्व सोडले नव्हते. त्यांनी आपल्या विचारांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मनात कायम एक धाक व भीती निर्माण केली होती. मात्र, काल दोन्ही नव्या पिढीच्या ठाकरेंनी जसे गाडीवर चढून बाळासाहेबांची नक्कल कर

.

नीतेश राणे म्हणाले की, बांगलादेशमध्ये ज्यावेळी हिंदूंना पकडून-पकडून मारले जात होते, त्यावेळी आजचे ठाकरे त्यावर कधीही एक शब्दही बोलले नाहीत. या ‘वाकरेंना’ कधी बांगलादेशातील हिंदूंची काळजी वाटली नाही, त्यासाठी कधी मोर्चे काढावेसे वाटले नाहीत किंवा गाडीच्या टपावर उभे राहून आवाज उठवावासा वाटला नाही. मात्र, उघडपणे हिंदूंची बाजू घेणारे आता त्यांना चालत नाहीत.

मनसेच्या कार्यकर्त्यांची हिंदूंना मारहाण

नीतेश राणे म्हणाले की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम महिलेच्या तक्रारीवरून भाईंदरमध्ये एका हिंदू नागरिकाला मारहाण केली. उद्धव ठाकरेंसोबत युती किंवा संगत ठेवल्यामुळे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसू नये

नीतेश राणे म्हणाले की, अमित ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले होते की, 1975 ला आणीबाणी लागली त्यावेळी इंटरनेट बंद झाले होते! अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसणे टाळले पाहिजे, कारण त्यांच्या वाईट संगतीचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. काल आदित्य ठाकरेंना पोलिसांच्या गाडीवर उभे राहून ज्या पद्धतीने ओरडताना आपण पाहिले, कदाचित त्यांनी काल नशेत जास्त जोर लावला असावा. दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये ‘नार्कोटिक्स’ विभागाकडे अशी चॅट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आदित्य ठाकरे हे ड्रग्जचे सेवन करत असल्याचे स्पष्ट होते. कालच्या आंदोलनातील त्यांच्या वर्तनातून तेच पुन्हा दिसून आले. लोकशाहीच्या विरोधात बोलायचे आणि उघडपणे ‘व्होट जिहाद’चे समर्थन करायचे, हेच त्यांचे राजकारण उरले आहे.

हे ही वृत्त वाचा

ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या!:शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनाप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या धरपकडीला विरोध करत आंदोलनात उडी घेणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *