Headlines

Omraje Nimbalkar Statement On MPSC Student Protest Success


पुण्यातील अलका टॉकीज चौक आणि एस. एम. जोशी पुलावर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा (MPSC) उमेदवारांच्या ऐतिहासिक आंदोलनाला अखेर मध्यरात्री यश आले आहे. राज्य शासनाने बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत उच्चस्तरीय चौकशी आयोगाची घो

.

काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गेले असता काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. मात्र, विद्यार्थ्यांचा तो विरोध बाजूला ठेवून, “मी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या बाजूनेच होतो आणि राहीन,” असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

शासनाचा घटक असलो तरी विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च -ओमराजेंचे ट्विट

आंदोलन स्थगित झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. “एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करणे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाणे, ही विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पावले आहेत. शासनाने स्वीकारलेल्या या सकारात्मक भूमिकेचे मी स्वागत करतो.”

विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे अभिनंदन

“गेल्या 12 दिवसांपासून कडाक्याचे ऊन आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे, संयमाचे आणि एकजुटीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कष्टाने अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि गुणवत्तेनुसार संधी मिळायलाच हवी. शासनाचा एक घटक म्हणून या निर्णयांची प्रत्यक्ष जमिनीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी कटिबद्ध आहे.”

आंदोलनस्थळी उडालेली हुर्रे अन् ओमराजेंचे ते सडेतोड प्रत्युत्तर!

काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात आंदोलनस्थळी भेट दिली होती, तेव्हाचा प्रसंग चांगलाच गाजला होता. ओमराजे मंचावर पोहोचताच काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली, हुर्रे उडवली आणि त्यांच्या पक्षांतराचा मुद्दा उपस्थित करत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

खालून धडका घेऊन आलोय

या गोंधळाला मंचावरूनच उत्तर देताना ओमराजे म्हणाले होते, “ओमराजे असाच मोठा झालेला नाही. जमिनीवरून धडका खात आणि संघर्ष करत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. 24 तास मतदारसंघात राबलो, सर्वसामान्यांची कामे केली; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, ही राजकीय वस्तुस्थिती होती. त्यामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. मात्र, मी तुमच्या हक्कासाठी इथे आलो आहे.” त्यांनी हा विरोध शांतपणे स्वीकारत विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्यांना थेट पाठिंबा दर्शवला होता.

भीमनवारांची नैतिकता आणि मध्यरात्रीचा जल्लोष

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत माहिती दिली. “पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी जाहीर झाली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे चौकशी सुरू असेपर्यंत पदावर न राहता रजेवर जाण्याचा निर्णय मी स्वतःहून घेतला आहे. आयोगाची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे हित माझ्यासाठी सर्वोच्च राहील.”

रोहित पवारांना खांद्यावर घेत जल्लोष

मागण्या मान्य झाल्याचे अधिकृत पत्र मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने प्राप्त होताच आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांच्या मान्य झालेल्या प्रमुख मागण्यांचा तपशील:

शासनाने मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या निर्णयानुसार खालील मागण्या मान्य झाल्या आहेत.

  • उच्चस्तरीय चौकशी आयोग: माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे या आयोगाचे सचिव असतील. या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
  • सर्व स्तरांवर चौकशी: एमपीएससीच्या आजी-माजी अध्यक्षांपासून ते अगदी लिपिक-शिपायांपर्यंत सर्वांची सखोल चौकशी होणार.
  • गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन: आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे (FIR) शासन मागे घेईल.
  • भरती आणि जागांमध्ये वाढ: आगामी 3 वर्षांत 70 हजार रिक्त पदांची मेगाभरती केली जाईल; तसेच 2027 मधील ‘गट-क’ परीक्षेतील पदसंख्या वाढवण्यात येईल.
  • तहसीलदार भरतीतील बदल: तहसीलदार संवर्गातील भरती प्रक्रियेत 60-40 ऐवजी 50-50 असा समसमान गुणोत्तर रेश्यो लागू होईल.
  • ऑफलाइन परीक्षा आणि एकच अभ्यासक्रम: एमपीएससीच्या सर्व परीक्षा पारदर्शकतेसाठी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील आणि पोलीस भरतीसाठी राज्यभरात एकच अभ्यासक्रम राहील.
  • आयोगाचा विस्तार: आयोगातील सदस्यांची संख्या वाढवून ती 11 पर्यंत केली जाईल.

12 दिवसांच्या अखंड लढ्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून, आता तुकाराम मुंढे आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या चौकशी अहवालाकडे आणि शासनाच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

—————————————————————-

हेही वाचा…

दोन महिन्यांत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार:11 दिवसांच्या संघर्षानंतर रोहित पवार म्हणाले- हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय

“विजय विद्यार्थी एकजुटीचा… विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा… आणि चिकाटीचा…” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सलग 11 दिवस पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या यशानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशात साथ देणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचेही आभार मानले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.