Headlines

राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा:सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू, CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात




देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच युवक आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष व इंडिया आघाडीने देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर इंडिया आघाडीने मोर्चा काढला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने जे चालवलेले आहे ते पूर्णपणे संविधान विरोधी आहे. संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम करणे सुरू आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, सीएजी, आरबीआय या सगळ्या संस्था कुचकामी आहेत असं दाखवायचं, लोकांना संवैधानिक संस्थांना न्याय देऊ शकत नाही असं सांगायचं आणि शेवटी सांगायचं की संविधान बदलावं लागेल. त्यांना अती डावी विचारसरणी लादायची आहे. संविधानाला नाकारण्याचं काम राहुल गांधी आणि विरोधकांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी तुम्ही म्हणता आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि मुख्य न्यायाधीशांनी आमचे निवेदन घेतले पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे? सर्वोच्च न्यायालय हे सेपरेशन ऑफ पॉवर प्रमाणे वेगळे आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाचेही निवेदन घेता येत नाही. कुठलेही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार तुम्ही केस टाका त्यावर सुनावणी करण्याचा आहे. मी तर सांगतो हे जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. माझा सवाल आहे, तुम्ही सांगा सर्वोच्च न्यायालयाने आणि मुख्य न्यायाधीशयाने आंदोलनाला सामोरे जाणं हे भारतीय संविधानात अपेक्षित आहे का? हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे, त्याला अपेक्षित आहे का? भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचा अशा पद्धतीने अवमान करता येतो का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. संविधान बदलण्याचे कॉंग्रेसचे षड्यंत्र पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्व न्यायाधीशांशी चर्चा करून असं सांगतात की भारतीय संविधानात आम्हाला अशा प्रकारे वागता येणार नाही. तुम्ही केस दाखल करा, तुम्ही संवैधानिक अधिकाराचा वापर करा, त्याची सुनावणी आम्ही तात्काळ घ्यायला तयार आहोत. तर सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या जातात. म्हणजे सुप्रीम कोर्टाला देखील कमकुवत करण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच्यामागचं डिझाईन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान नाकरणं हेच आहे. हे पहिल्यांदा होत नाहीये. 1975 साली राहुल गांधी यांच्या आजी स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी संविधान संशोधन करून संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्वात महत्त्वाचे अधिकार दिले होते, मूलभूत अधिकार गोठवले. मूलभूत अधिकारांचं हणण झालं तर तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही, अशा प्रकारे संविधान संशोधन केलं होतं. हा इतिहास या कॉंग्रेस पक्षाचा आहे आणि म्हणून आजही तोच प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यावेळी देखील आम्ही संघर्ष केलं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पुन्हा पूर्ववत करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावू देणार नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही काही झालं तरी तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावू देणार नाही. जंतर-मंतरवर जेव्हा अराजकता सुरू होती. आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्गोरिदम सेट झाले होते आणि केवळ आराज्यकतेचा कंटेंट त्यावर येत होता. त्यानंतर बसलेल्या परलियमेंटरी कमिटीसमोर या सगळ्या प्लॅटफॉर्मने कबूल केलं की हो त्यावेळी मोठ्या प्रमाणात हे सगळे पोस्ट बूस्ट करण्यासाठी आम्हाला पैसा मिळाला आणि हा पैसा विदेशी देखील असू शकतो, असं त्यांनी कबूल केलं होतं. एवढंच नाही तर माननीय प्रधानमंत्र्यांची पोस्ट काढून टाकण्यात आली आणि त्यासाठी मेटाने माफी देखील मागितली होती. आपण लक्षात घेतले पाहिजे की कॉंग्रेस पक्ष सातत्याने हारल्यामुळे आणि आता त्यांना पुन्हा जिंकण्याची शक्यता दिसत नसल्याने तामिळनाडूत 59 वर्षांपासून ते नाहीत, बंगालमध्ये नाहीत, गुजरातमध्ये नाही, जवळपासस 18 असे राज्य आहेत जिथे कॉंग्रेस अनेक वर्षांपासून नाही. त्यामुळे हा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *