Headlines

शिक्षक मतदारसंघासाठी 35810 मतदारांची यादी जाहीर:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केली घोषणा; 23 ऑक्टोबरला मतदान




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांची बहुप्रतिक्षित यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही घोषणा केली. यानुसार, ३५ हजार ८१० मतदार शिक्षक आमदार निवडतील. हे मतदार ८१ मतदान केंद्रांवरुन मतदान करतील. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ९७ मतदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४, यवतमाळमध्ये ६ हजार ९३२, अकोल्यात ५ हजार ९४२ तर वाशिम जिल्ह्यात ३ हजार ७१५ मतदार नोंदवले गेले आहेत. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवार गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीची मागणी करत होते. २६ सप्टेंबर रोजी शेवटचा मतदार नोंदवला गेला. पडताळणी आणि डेटा एंट्रीला वेळ लागल्याने यादी जाहीर होण्यास उशीर झाला, असे निवडणूक यंत्रणेने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *