Headlines

मराठवाड्यात करवंद उद्योगाचे नवीन पर्व:'वामन्स फूड' आणि कृषी विद्यापीठात महत्त्वपूर्ण करार, विद्यार्थ्यांनाही क्षेत्रभेटीसाठी पर्याय




वसमत तालु्क्यातील इंजनगाव येथील सदा करवंद वाण विकसीत करणारे शेतकरी सदाशिव अडकिणे यांच्या वामन्स फुड व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ यांच्या सामंजस्य करार झाला असून या करारानुसार आता मराठवाड्यात करवंदाच्या उद्योगाचे नवीन पर्व सुरु होणार आहे. या शिवाय अन्न तंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनाही क्षेत्रभेटीसाठी मोठा पर्यांय उपलब्ध झाला आहे. वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांनी सदा करवंद हे वाण विकसीत केले आहे. या वाणापासून ते चेरी, लोणचे तयार करून त्याची विक्री करतात. राज्यात सर्वच ठिकाणी त्यांच्या करवंदांची मागणी आहे. मात्र करवंदापासून चेरीसोबतच इतर विविध मूल्यवर्धित उत्पादने देखील घेता येत असतांनाही त्याचे उत्पादन सुरु करण्यात आले नाही. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये विविध करवंद मूल्यवर्धित पदार्थ जसे की करवंद पेय, करवंद जाम करवंद जेली करवंद चेरी करवंद घर घर गर भुकटी व त्यापासून करवंद मुखवास आणि चाट मसाला करवंद गराची आईस कँडी करवंदाचे लोणचे करवंदाची चटणी करवंद वाईन इत्यादी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या अनुषंगाने सदरील विकसित तंत्रज्ञान शेतकरी अडकिणे यांच्या उत्पन्न वाढीसाठी वितरित करण्याच्या हेतूने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालय आणि शेतकरी तथा उद्योजक सदाशिव अडकीने यांच्या वामन अन्नप्रक्रिया उद्योग याच्यासोबत कुलगुरू डॉ.इंद्र मणी सर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे. सदरील सामंजस्य करारा अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयांमध्ये करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने यांचे तंत्रज्ञानाचा वामन्स फुड यांना उपयोग होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण घेण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. या करारामुळे पुढील काळात करवंद उत्पादक शेतकऱ्यांना करवंद प्रक्रिया मूल्यवर्धनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे यावेळी डॉ.राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. ठोंबरे, अन्नतंत्र महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. गाडे, डॉ. जी एम माचेवाड, डॉ.एस के सदावर्ते, करवंद प्रक्रिया मूल्यवर्धन संशोधन शास्त्रज्ञ डॉ.जोशी शिक्षण सहयोगी डॉ. देशमुख व इतरांची उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *