Headlines

सरकारचा कुटील डाव, साखर रोखणार; राजू शेट्टींचा इशारा:मुख्यमंत्र्यांकडून सामंजस्याचे आवाहन, म्हणाले- आपले कारखाने बंद राहिल्यास कर्नाटकचा फायदा




ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे. एकीकडे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर ‘कुटील डाव’ खेळत असल्याचा गंभीर आरोप करत कारखान्यातून साखर बाहेर पडू न देण्याचा इशारा दिला आहे; तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कारखाने बंद राहिल्यास कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातील ऊस पळवून नेतील, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. “सरकारचा कुटील डाव हाणून पाडणार”- राजू शेट्टी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सरकारने आमच्यावर आंदोलन मोडून काढण्यासाठी दबाव आणला आहे. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू नयेत, यासाठी कोणत्याही परिस्थितीत साखर बाजारात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.” सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आता आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करताना शेट्टी म्हणाले, “आम्ही कारखान्यातून बाहेर पडणारी साखर अडवणार आहोत आणि कारखान्यांना जाणारा ऊसपुरवठा पूर्णपणे बंद पाडणार आहोत.” “कर्नाटकचे कारखाने ऊस पळवतील”- मुख्यमंत्र्यांचे आवाहन राजू शेट्टींच्या या आक्रमक इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट करत आंदोलकांना साद घातली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “माझी आंदोलकांना विनंती आहे की, आपण जेव्हा महाराष्ट्रात असे कारखाने बंद ठेवतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातून ऊस घेऊन जातात. यामुळे आपल्या राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम (सीझन) कमी होतो. आंदोलकांनी या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.” ‘दुष्काळाचे वर्ष, शेतकऱ्यांना पेमेंट लवकर मिळणे गरजेचे’ राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याचा मार्ग पत्करण्याची विनंती केली. “यंदाचे वर्ष दुष्काळाचे आहे आणि शेतकरी आधीच होरपळलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जेणेकरून कारखाने लवकर सुरू होतील, ऊस वेळेवर तिथे पोहोचेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पेमेंट लवकर मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे,” असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आता राज्य सरकार विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा थेट संघर्ष उभा राहिल्याचे चित्र आहे. राजू शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आगामी काळात ऊस कोंडी फुटणार की आंदोलन आणखी चिघळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ——————– हेही वाचा.. अंगणवाडी सेविका, मदतनिसांची दिवाळी गोड: भाऊबीज भेट मिळणार 2 हजार रुपये, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,08,627 सेविका
यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असले आणि शेतकरी हवालदिल झालेला असताना राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *