![]()
शहरातील प्रसिद्ध अंबादेवी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. नवरात्र उत्सवादरम्यान शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे
.
विसर्जनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता विसर्जन मार्गाची आधीच तपासणी करावी. मार्गावर असलेले अडथळे, अनधिकृत अतिक्रमणे आणि नागरिकांच्या हालचालींमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या बाबी वेळेत दूर कराव्यात, असेही आयुक्तांनी सांगितले. या पाहणीच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाच्या कालावधीत शहरातील नागरी सुविधा, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्तांच्या या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, झोन क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उपअभियंता दिनेश हंबर्डे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
मंदिर परिसर,गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य नवरात्र उत्सवादरम्यान शहरातील मंदिर परिसर, सार्वजनिक देवी मंडळे, गरबा-दांडियाची ठिकाणे, प्रमुख चौक आणि भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वच्छता विभागावर सोपविण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी कचरापेट्या उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि जमा होणारा कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांची विक्री, सार्वजनिक कार्यक्रम आणि भाविकांची वर्दळ यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणतीही कुचराई होऊ नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही सांगण्यात आले.
पथदिवे, विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासण्याचे निर्देश नवरात्र उत्सवादरम्यान रात्रीच्या वेळी धार्मिक कार्यक्रम, गरबा-दांडिया आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रमुख रस्ते, चौक, मंदिर परिसर, नवरात्र मंडळे आणि विसर्जन मार्गांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश विभागाला सर्व संबंधित भागांतील पथदिवे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नादुरुस्त पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी. विद्युत तारा आणि केबल्स सुरक्षित आहेत की नाहीत, याची तपासणी करावी. या पार्श्वभूमीवर प्रकाश विभागाला गर्दीच्या ठिकाणी अंधार राहणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. देवी विसर्जनाच्या दिवशी परिस्थितीनुसार अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.