![]()
येथील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आगामी शुक्रवार, १६ ऑक्टोबरला इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत विद्यार्थी-युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचा निषेध या धरणे आंदोलनाद्वारे केला जाणार असून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला जाणार आहे. तशी आखणी शहरात करण्यात आल्याचे या आंदोलनाचे समन्वयक तथा अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे नेते प्रा. साहेबराव विधळे यांनी आज, बुधवारी माध्यमांना सांगितले. शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या आंदोलनात विविध संघटनांचे विद्यार्थी, तरुण, तरुणी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही अमरावतीचे लोक…’ या बॅनरखाली हे आंदोलन केले जाईल. देशातील व राज्यातील बदलत्या वातावरणात सत्तेत असलेल्या पक्षांकडून लोकशाही मूल्यांची होत असलेल्या पायमल्लीवर आक्षेप घेण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला लगाम लावणे, भारतीय संविधानाचे रक्षण करणे, हा यामागचा उद्देश आहे. एसआयआर रद्द करणे, मतपत्रिकेवर मतदान घेणे, मतांची हेराफेरी थांबवणे, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रा. साहेबराव विधळे यांच्याशिवाय प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, सुनील घटाळे, राजाभाऊ गुडधे, पंकज सोनोने, अनिल वानखडे, मनोज तायडे, निलेश बनारसे, संतोष यावले आदी मान्यवर उपस्थित होते.
Source link
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 16 ला आंदोलन:विविध संघटनांचा सहभाग, इर्विन चौकात देणार दिवसभर धरणे