![]()
अखिल अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन यांचे विचार सामाजिक समरसतेसाठी आहेत. सामाजिक समरसता आणि उद्योगप्रधान व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी समाजातील तरुणांनी महाराजा अग्रसेन यांच्या विचारांचे पालन करावे, असे प्रतिपादन अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गोयनका यांनी केले. अग्रवाल समिती ट्रस्ट, अकोट यांच्या वतीने आयोजित अग्रसेन जयंती समारोहात प्रदीप गोयनका उद्घाटक म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरच्या शकुंतला अग्रवाल, उषागोयनका, अग्रवाल समिती ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत अग्रवाल, सचिव कमलकिशोर झुनझुनवाला, उपाध्यक्ष अविनाश अग्रवाल, कोषाध्यक्ष रामविलास अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्ष भारती अग्रवाल, अग्रवाल सखी मंडळाच्या अध्यक्ष निधी अग्रवाल, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अग्रवाल आदी उपस्थित होते. अग्रवाल समितीच्या वतीने प्रदीप गोयनका यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. गोयनका म्हणाले की, समाजातील तरुण-तरुणींचे विवाह २४ ते २५ वर्षांच्या वयातच व्हावेत. यामुळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण कमी होऊ शकते व कौटुंबिक जीवन अधिक बळकट होऊ शकते. त्यांनी महाराजा अग्रसेन यांच्या सामाजिक समरसता, उद्यमशीलता व समाजहित या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. अभिजित श्रावगी यांनी सूत्रसंचालन केले.
Source link
प्रदीप गोयनका यांचे जयंती समारंभात प्रतिपादन:महाराज अग्रसेन यांच्याविचारांचे पालन करा