Headlines

शेतात विद्युत तारेचा धक्का लागून 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू:कुऱ्हा येथील जामठी शेत शिवारात घडली घटना, परिसरात शोककळा




कुऱ्हा येथील जामठी शेत शिवारात गुरुवारी सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. निलेश शामसुंदर सुजिया असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. निलेश शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. सकाळी त्यांनी विद्युत प्रवाह बंद न करताच पाणी देण्यास सुरुवात केली. याच वेळी विद्युत प्रवाह असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तिवसा येथे पाठवला. निलेश हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे सुजिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *