Headlines

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा; आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन:अमरावतीत जिल्हा परिषदेसमोर धरणे, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर




महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अमरावतीत आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. शुक्रवार, १६ ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन आणि धरणे दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये करार पद्धत बंद करून सेवेत कायम करणे, तसेच वेळेवर मानधन देणे यांचा समावेश आहे. केआरएसाठी मानसिक छळ करणाऱ्या प्रकल्प संचालकांची बदली करण्याची स्थानिक मागणीही आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचे पुढारी अमोल देवलसी यांनी केआरएमध्ये प्रतिकूल शेरे आणि करारांचे नूतनीकरण कमी कालावधीसाठी केले जात असल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मोर्चाच्या शेवटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *