![]()
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा एक महिना आधीच गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देणार असून, शेतकऱ्यांनी याच कारखान्याला ऊस देऊन विश्वासाचे नाते दृढ करावे, असे आवाहन बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी गुरुवारी केले. कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यंदा ८ लाख २५ हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कन्नड तालुक्यातील उसात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने रिकव्हरी चांगली येते, त्यामुळे गतवर्षी मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजेच ३,१२७ दर दिला होता. यंदाच्या हंगामात प्रतिदिन ६,५०० ते ६,८०० टन याप्रमाणे ८ लाख २५ हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, हंगाम ११० दिवस चालणार आहे. या सोहळ्यास व्हा. प्रेसिडेंट मिलिंद देशमुख, सतीश तेलहंडे, शेतकी अधिकारी आसिफ खान पठाण, मुख्य अभियंता सुनील चौळके, उत्पादन व्यवस्थापक सखाहरी जाधव, सतीश कुलकर्णी, रणवीर गैरवार, मिलिंद बोचरे, तुकाराम जोशी, गणेश चव्हाण, प्रभाकरराव चव्हाण, भगवानराव चव्हाण, सोपानराव चव्हाण, सरपंच शिवत्रे, सर्जेराव चव्हाण, पांडुरंग बोंगाने, कैलास बोंगाणे, सुभाष बांगर, तोडणी ठेकेदार आप्पासाहेब कमानदार, शेणपुडू साळवे, सय्यद निसार, पंकज पवार, योगेश काळे, अशोक दाणे, किशोर वाघुंडे, भगवान राऊत, गणेश हरिश्चंद्रे, खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कारखाना कार्यक्षेत्रात ६५,९३८ एकर ऊस उपलब्ध कारखाना कार्यक्षेत्रात ३४,२१६ एकर तर इतर क्षेत्रात २८,७२२ असा एकूण ६५,९३८ एकर ऊस उपलब्ध आहे. ऊस वाहतुकीसाठी २३० बैलगाड्या, ३६९ ट्रॅक्टर व २८१ ट्रॅक्टर-गाडी जुगाड वाहने तैनात करण्यात आली आहेत. प्रारंभी कारखान्याचे कर्मचारी धनराज पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजा व मोळीपूजन करण्यात आले.
Source link
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्त भाव देण्याची ग्वाही:बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे यंदा 8 लाख 25 हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट