Headlines

रामदास आठवलेंचा दुष्काळी दौरा:म्हणाले- 5 हजार रुपयांची मदत अपुरी, वाढीव निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार




राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळी सणासाठी अत्यंत अपुरी असून, शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी यासाठी आपण थेट सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाढीव मदतीसाठी पाठपुरावा रामदास आठवले सध्या राज्याच्या दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून सरकारने जाहीर केलेली ५ हजारांची मदत पुरेशी नाही. ही मदत वाढवून मिळण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. दुष्काळामुळे माणसांप्रमाणेच जनावरांचीही अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. भविष्यात असे दुष्काळी संकट पुन्हा उद्भवू नये, यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याला आणि वृक्षारोपणाला विशेष महत्त्व देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्राकडून लवकरच मदत मिळणार राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नुकतेच येऊन गेले आहे. या पथकाचा अहवाल प्राप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार राज्याला लवकरच भरीव आर्थिक मदत करेल, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेच्या जागेवर दावा या पत्रकार परिषदेत आठवले यांनी केवळ दुष्काळावरच नव्हे, तर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांपैकी किमान एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (RPI) मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेत आता आरपीआयनेही आपला वाटा मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. —————- हेही वाचा.. अभिनेते शरद पोंक्षेंचे वादग्रस्त विधान:युरोपात लोक रानटी अवस्थेत होते, तेव्हा आमच्या पूर्वजांनी ‘मनुस्मृती’च्या रूपाने जगातील पहिलं संविधान लिहिलं!
“ज्या काळात युरोपातील प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांमधील जनता अंगावर कपडे कसे घालायचे याचेही भान नसलेल्या रानटी अवस्थेत जंगलात वावरत होती, त्या अत्यंत प्राचीन काळात माझ्या ऋषितुल्य पूर्वजांनी जगातील पहिला संविधान ग्रंथ लिहिला; आणि तो ग्रंथ म्हणजेच ‘मनुस्मृती’ होय,” असे अत्यंत वादग्रस्त प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे. भारतीय संस्कृती, प्राचीन ज्ञानपरंपरा, संस्कृत भाषा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेचा जागर करताना पोंक्षे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक धोरणांवर टीका केली. तसेच, “भाजपच्या अनेक गोष्टी पटत नसल्या तरी हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आणि आपल्या मुलींना बुरख्यात पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून भाजपचेच सरकार हवे,” अशी राजकीय भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *