![]()
नागपूरच्या गणेश पेठेतील आग्याराम देवी मंदिरात महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण स्पर्धा नुकतीच झाली. विश्व हिंदू परिषद, मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम आणि आग्याराम देवी मंदिर ट्रस्टने ती आयोजित केली. यात ४७ मंडळांतील ५०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांमध्ये स्तोत्र पठणाची आवड निर्माण करणे आणि धार्मिक संस्कार रुजविणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. यातून महिला शक्तीचा जागर आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. ही स्पर्धा दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत मानेवाडा येथील गुरुप्रसाद भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. गुरुमाऊली भजन मंडळाला द्वितीय, तर पिंगळाई भजन मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. कनक सुर मंदिरसह इतर काही मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले. या आयोजनासाठी दुर्गा मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री गजानन मंदिराने सहकार्य केले. अश्विनी काणे, विशाखा पाध्ये आणि सपना खांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. हेही वाचा.. मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय: अर्धवट विसर्जित दुर्गामूर्तींचे फोटो काढण्यावर आणि व्हायरल करण्यावर कडक बंदी
दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा विसर्जनाच्या वेळी पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विसर्जित झालेल्या (बुडालेल्या) दुर्गामूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास आणि ते सोशल मीडियावर पसरवण्यावर पोलिसांनी कडक बंदी घातली आहे. सविस्तर वाचा
Source link
नागपुरात 500 हून अधिक महिलांचे सामूहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण:47 मंडळांचा सहभाग; गुरुप्रसाद भजन मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक