![]()
कॉकरोच जनता पार्टीकडून मुंबईतील आझाद मैदानावर ‘तिरंगा फडकवूया, देशाभिमान जागवूया!’ म्हणजेच ‘लहेरा दो तिरंगा’ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला रीतसर परवानगी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सीजेपीचे नेते आशुतोष रांका व सौरव दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी प्रामुख्याने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संदीप देशपांडे हेदेखील सहभागी झाले आहेत. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना संदीप देशपांडे यांनी म्हटले की, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. पक्षाची लढाई नाही, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही तिरंगा लहेरा दो साठी आलोय. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, प्रशांत भूषण बोलले रिजीम चेंज हवाय, हो आम्हाला बदल हवाय तो मतं देऊन बदल हवाय. संदीप देशपांडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे, तो मोदी शहा हिरावून घेऊ शकत नाहीत. जेवढा चेंडू दाबायचा प्रयत्न कराल तेवढा चेंडू उसळणार, असा इशाराही देशपांडे यांनी दिला. आम्हाला तुमची राजवट नको आहे. तुम्ही सत्तेत असताना फेले गेला आहात, म्हणून आम्हाला तुमची सत्ता नकोय, असे देशपांडे यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, अराजकता कोण पसरवत आहे? तुम्ही आयडीबीआय बँक इतर सगळ्या गोष्टी विकायला काढले आहेत. या गोष्टींवर आम्ही बोलायचे नाही? आम्ही शांततेत आंदोलन करायचं आणि तुम्ही परवानगी सुद्धा द्यायची नाही? तिरंगा हातात घेऊन आंदोलन करायचं नाही? असे प्रश्न देशपांडे यांनी केले आहेत. सीजेपीचे दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ दरम्यान, सीजेपीकडून आज नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कवर लहरा दो तिरंगाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाच्या आधीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांनी दिपके यांना हे आंदोलन न करण्याबाबत नोटीस देखील दिली असल्याची माहिती आहे.
Source link
'आम्हाला तुमची सत्ता नकोय, तुम्ही फेल ठरलात':संदीप देशपांडेंची भाजपवर टीका; म्हणाले- आम्ही मतदानाद्वारे बदल करणार