Headlines

क्रिकेटमधील मानसिक सामर्थ्याचे रहस्य उलगडणार!:बलविंदर सिंग संधूंच्या नव्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन




भारताला १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे भारताचे माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांनी लिहिलेल्या ओपन माईंड – द इनर गेम ऑफ क्रिकेट या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात करण्यात येणार आहे. पुण्यातील क्रिकेटचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक पीवायसी हिंदू जिमखाना येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळात पार पडणाऱ्या अनौपचारिक समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून क्रिकेट साठी आवश्यक असलेल्या एकाग्रता, मानसिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास या गुणांच्या समुच्चयासाठी आवश्यक असलेले परिश्रम यासंबंधी या पुस्कात मार्गदर्शन करण्यात आले आहे. खेळाडू केवळ गुणवान असून चालत नाही तर त्याचे मैदानावरील परिश्रम आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशक व मानस तज्ञांचे साहाय्य याबाबी पुस्तकात सविस्तरपणे बलविंदर सिंग संधू यांनी विशद केल्या आहेत. बलविंदर सिंग संधू यांनी १९८३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे जगविख्यात सलामीवीर गॉर्डन ग्रीनेज या स्वस्तात बाद करून भारताच्या विश्वचषक विजयाचा मार्ग मोकळा केला होता. सुमारे दीड दशक स्पर्धात्मक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यांनंतर बलविंदर सिंग संधू यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि मुंबई रणजी क्रिकेट संघ यांच्यासाठी प्रशिक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली. तसेच, उत्कृष्ट प्रशासक म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला. एक बुद्धिमान गोलंदाज व विचारी क्रिकेटपटू अशी त्यांची ख्याती असून त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दल क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *