![]()
नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. कोणतीही लिंक डाउनलोड न करता किंवा ओटीपी न देता एका बँक खात्यातून तब्बल ९.८८ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे गायब झाले होते. या प्रकरणी एका वकिलासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वडोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेचा तपास करताना पोलिसांना मोठे आर्थिक जाळे सापडले. तपासात एक हजारांहून अधिक बँक खाती, फिनटेक कंपन्या, हवाला व्यवहार आणि सोन्याच्या खरेदीचे धागेदोरे समोर आले. पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेपैकी सुमारे ४.२१ कोटी रुपये रोखण्यात किंवा हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयांत वकिली करणारा आहे. त्याने या फसवणुकीसाठी मार्गदर्शन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या खात्यातून ४ ते ६ जुलै दरम्यान व्यवहार झाले होते, त्यानंतर ८ जुलैला गुन्हा दाखल झाला.
Source link
लिंक-ओटीपी नसतानाही बँक खात्यातून 9.88 कोटी गायब:वकिलासह सहा आरोपींना अटक, तपासात हजारो बँक खात्यांचे जाळे उघड