Headlines

हिंगोली जिल्ह्यातील शाळांमधून वाचन चळवळ समृध्द होणार:बुक डोनेशन शिबीरात 875 शाळांना मिळाली 25 हजार पुस्तके




हिंगोपली जिल्ह्यातील शाळांमधून वाचन चळवळ समृध्द व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शाळास्तरावरूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शनिवारी ता. 17 राबविण्यात आलेल्या बुक डोनेशन शिबीरात 875 शाळांमधून 25 हजार पेक्षा अधिक पुस्तके गोळा झाली आहेत. शाळांमधील ग्रंथालयात हि पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी ठेवली जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ता. 17 सप्टेंबर ते ता. 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागरीकांना प्रमाणपत्र वितरणासह गावपातळीवर आरोग्य, शिक्षण उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून असलेल्या ग्रंथालयात दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत तसेच या पुस्तक वाचनाच्या माध्मयातून विद्यार्थ्यांमधून वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शनिवारी ता. 17 एकाच वेळी सर्व शाळांमधून बुक डोनेशन शिबीर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये लोकसभागातून पुस्तके उपलब्ध करून घेत हि पुस्तके शाळांमधून ग्रंथालयात ठेवण्याच्याही सुचना त्यांनी दिल्या. त्यानुसार आज जिल्ह्यातील 875 जिल्हा परिषद शाळामधे बुक डोनेशन कँप झाला. या उपक्रमात गावकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला असून एकाच दिवशी सर्व शाळांमधून 25 हजार पेक्षआ अधिक पुस्तके जमा झाली. हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी मंजूश्री कल्लेवाड, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, मधुकर राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या शिवाय गणेशवाडी प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी शिक्षणाधिकारी मंजूश्री कल्लेवाड, उपशिक्षणाधिकारी शेख यांच्यासह नागरीक उपस्थित होते. यावेळी कुलदीप मास्ट यांनी शाळेच्या गुणवत्तेची माहिती दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, मिलींद यंबल, ॲड. सुरेश गडदे, दीपक नेनवाणी, गंगाधर लोंढे, निकुंज अग्रवाल, संतोष डहाळे, पवन यादव यांनी शाळेला भेट देऊन पुस्तके दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *