![]()
तिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील १८ वर्षांचा अर्पित मंगेश मुंद्रे हा आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. तो १४ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात गेला, पण घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अर्पित गुरुकुंज मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वेल्डर ट्रेडच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो अनकवाडी येथून दररोज आयटीआयमध्ये येतो-जातो. १४ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता तो नेहमीप्रमाणे घरून निघाला होता. संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही म्हणून वडील मंगेश रामकृष्ण मुंद्रे (वय ४८) आणि कुटुंबीयांनी महाविद्यालय, नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली. अखेर वडिलांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थी बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत आणि त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
Source link
गुरुकुंज मोझरीतून आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता:वडिलांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू