Headlines

ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांसाठी सीईओ सत्यम गांधींनी आढावा घेतला:व्यापक नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चा




अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात साडेसहा तासांची आढावा बैठक झाली. यात १४ तालुक्यांमधील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती तपासण्यात आली. या बैठकीत अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य संस्था, ग्रामपंचायत कार्यालये, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्मशानभूमी आणि तलाव पुनरुज्जीवन यांसारख्या सुधार अभियानातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी कामांची माहिती दिली. सीईओ गांधींनी सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विभागांनी समन्वय साधून कामांना गती द्यावी, तसेच नियमित आढावा घेण्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीला जिल्हा स्तरावरील विभागप्रमुख आणि १४ तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम बनवणे हेच अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सीईओ गांधी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *