Headlines

सियाविरोधातील खटला उज्ज्वल निकम लढवणार,:आजवर 50 जणांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले




लोहगडजवळ व्यावसायिक केतन अग्रवालला दरीत ढकलून केलेल्या खून प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून शनिवारी नियुक्ती झाली. वडील विशाल अग्रवाल यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल, प्रियकर चेतन आणि मित्र रितेश यांच्यावर दोषारोपपत्र दाखल आहे. केतन अग्रवाल यांच्या मारेकऱ्यांविरुद्धचा “खटला जलदगती न्यायालयात चालवून तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केली होती. उज्ज्वल निकमच काॽ निकम यांच्या नियुक्तीमुळे सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात अत्यंत भक्कम होईल. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे पुराव्यांची साखळी प्रभावीपणे मांडली जाऊन आरोपींवरील दोष सिद्धीची शक्यता वाढेल. ॲड. निकम यांनी आजवर ५० आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *