Headlines

छत्रपती संभाजीनगरात ‘डिजिटल अरेस्ट’ची धक्कादायक घटना:दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा बनाव; निवृत्त कर्मचाऱ्याला 11 लाखांचा गंडा




“तुमच्या ओळखपत्राचा गैरवापर‎करून एका बँकेत बनावट खाते ‎उघडण्यात आले आहे. त्यातून‎ दहशतवादी कारवायांसाठी‎ कोट्यवधी रुपयांचा निधी‎पुरवण्यात आला आहे,’ अशी‎भीती दाखवून महावितरणमधील ‎एका ७१ वर्षीय निवृत्त‎कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’‎करत तब्बल ११ लाख रुपयांचा ‎गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ‎सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात‎सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा ‎दाखल करण्यात आला आहे.‎ तक्रारदार वृद्धाला २५ सप्टेंबर‎रोजी सकाळी एक फोन आला.‎समोरील व्यक्तीने “डेटा प्रोटेक्शन‎अॅथॉरिटी ऑफ इंडिया”मधून‎बोलत असल्याचे सांगितले.‎ “तुमच्या ओळखपत्रावरून नाशिक‎येथील पत्त्यावर सिम कार्ड खरेदी‎करून बँक खाते उघडण्यात आले‎आहे. त्यावरून देशविरोधी‎कारवायांना निधी पुरवला जात‎आहे,’ अशी बतावणी केली.‎वृद्धाने असा कोणताही प्रकार केला‎नसल्याचे सांगितले. समोरच्याने‎नाशिकच्या पंचवटी पोलिस‎ठाण्यात तक्रार दाखल करत‎असल्याचे सांगत फोन बंद केला.‎ १० लाखांची मुदतठेव मोडून भरले ११ लाख‎ २९ सप्टेंबर रोजी भामट्यांनी पुन्हा व्हिडिओ कॉल केला. “कॉल‎बंद करू नका. सतत कॅमेऱ्यासमोर राहा,’ अशी तंबी देऊन‎वृद्धावर पाळत ठेवली. प्रचंड घाबरलेल्या वृद्धाने तात्काळ‎सिडको येथील पोस्ट ऑफिस गाठले. १० लाख रुपयांची मुदतठेव‎मोडली. ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा केली. त्यानंतर‎भामट्यांनी दिलेल्या “टीटीआर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड” या‎खात्यावर आरटीजीएसद्वारे तब्बल ११ लाख रुपये पाठवण्यास‎त्यांना भाग पाडले. पैसे मिळाल्यावर आरबीआयची खोटी पावती‎दाखवली. ८ ते १० दिवसांत पैसे परत मिळतील, असे सांगितले.‎कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी‎कुटुंबीयांनाही काही सांगितले नाही. अखेर ६ ऑक्टोबर रोजी‎वृत्तपत्रात ‘डिजिटल अरेस्ट’ संदर्भातील वृत्त वाचल्यानंतर‎आपली फसवणूक केल्याचे वृद्धाच्या लक्षात आले.‎ व्हिडिओ कॉलवर बनावट पोलिस‎अधिकारी अन् ‘डिजिटल अरेस्ट’‎ त्यानंतर आलेल्या व्हिडिओ कॉलवर खाकी‎गणवेशातील एका व्यक्तीने “मी पंचवटी पोलिस‎ठाण्यातून इन्स्पेक्टर संदीप राव बोलत आहे,’ अशी‎खोटी ओळख दिली. वृद्धाची कौटुंबिक व वैयक्तिक‎माहिती घेतली. दुसऱ्या एका भामट्याने राष्ट्रीय‎सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. तात्काळ अटकेची‎धमकी दिली. अटक टाळायची असल्यास रिझर्व्ह‎बँकेकडून (आरबीआय) खात्यांची पडताळणी‎करून घ्यावी लागेल, असा धाक दाखवला.‎त्यांच्याकडील सर्व बँक खाती, मुदतठेव, आरडीची‎माहिती मिळवली. ही सर्व रक्कम एकाच खात्यात‎जमा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांची मुदत दिली. “डिजिटल अरेस्ट”चा बनाव आणि वास्तव: कशी घ्याल काळजी?‎ अशा प्रकारातील महत्त्वाचे नियम‎ १. कायद्यात तरतूद नाही : भारतीय‎कायद्यात ”डिजिटल अरेस्ट” असा‎कोणताही प्रकार नाही. पोलीस व्हिडिओ‎कॉलवरून कोणालाही अटक करत नाहीत.‎ २. पैसे मागितल्यास सावध व्हा :‎कोणतीही तपास यंत्रणा आरबीआय किंवा‎सुरक्षेच्या नावाखाली बँक खात्यातून पैसे वर्ग‎करायला लावत नाही.‎ ३. तातडीने सायबरला करा संपर्क :‎असा संशयास्पद कॉल आल्यास घाबरून न‎जाता १९३० या सायबर हेल्पलाइनवर‎तात्काळ तक्रार नोंदवा.‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *