Headlines

जायकवाडीसह आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यातील पंपांचा पाणी उपसा बंद:15 अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम, नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई‎




पावसाने ओढ दिली, खरीप पिकांचे नुकसान झाले आणि आता उपलब्ध पाणी किती दिवस पुरणार, याची चिंता शेतकरी व ग्रामस्थांना सतावत आहे. अशा परिस्थितीत जलसाठ्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासन १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच ी टीम तयार करुन अनधिकृत मोटारीचा पाणी पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. सध्या आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यातील कृषी मोटारी काढायला सुरू करण्यात आल्याचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले. जायकवाडीच्या नाथसागरापासून तालुक्यातील मोठे, मध्यम आणि लघु जलप्रकल्पांसह बंधाऱ्यांपर्यंत पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल १५ संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार ज्योती पवार यांनी दिला. पैठण तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणाचा आणि मोठ्या खंडाचा फटका शेतीला बसला आहे. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांत आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन हा प्रशासनासाठी महत्त्वाचा विषय बनला आहे. अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल, पाटबंधारे, महावितरण, पोलिस प्रशासन, नगर परिषद आणि अन्य संबंधित विभागांच्या समन्वयातून १५ संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी उपशाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथक घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे. अनधिकृत वीज जोडणीच्या माध्यमातून पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जायकवाडी धरण परिसरासह हिरडपुरी, आपेगाव, चनकवाडी, देवगाव, गेवराई, विहामांडवा आणि तालुक्यातील अन्य लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या परिसरात देखरेख ठेवली जाणार आहे. जलसाठ्यांमधून नियमबाह्य पद्धतीने पाणी उचलले जात आहे का, याची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी केली जात आहे. पाणी उपशासाठी अनधिकृत साधनांचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित विभागांच्या मदतीने नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जलसाठ्यांच्या परिसरात अनधिकृतपणे पाणी उपसणाऱ्यांवर प्रशासनाची नजर राहणार आहे. महसूल, पाटबंधारे, महावितरण एकत्र उपलब्ध पाण्याचे संरक्षण करणे सुरू : दुष्काळाच्या संकटात उपलब्ध पाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल आहे, सध्या आपेगाव व हिरडपुरी बंधारेवरील मोटारी काढायला सुरुवात करण्यात आली आहे. -मंगेश शेलार, शाखा अभियंता जायकवाडी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *