Headlines

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा साधेपणाने:शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेकडो ट्रक रवाना, मुलींच्या लग्नाची चिंता करू नका, शिवसैनिक जबाबदारी घेतील- शिंदे




यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा शब्द देत शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे शेकडो ट्रक आज रवाना करण्यात आले. तसेच, शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‘दुष्काळात हात आखडता घेणार नाही’ दसऱ्याच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सध्या महाराष्ट्र आणि राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. गेल्यावेळी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले, तर यावेळी कोरड्या दुष्काळाचे संकट आहे. सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. आम्ही स्वतः बांधावर जाऊन त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि दुष्काळही जाहीर केला. तातडीची मदत म्हणून ५००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय झाला आहे. दुष्काळात मदत करताना सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही.” केंद्राचाही भक्कम पाठिंबा या संकटाच्या काळात केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शब्द दिला आहे की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या मदतीचे शेकडो ट्रक रवाना संकट मोठे असल्याने केवळ सरकारवर विसंबून न राहता सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन शिंदेंनी केले. “अशा परिस्थितीत शिवसेना कधीही मागे राहत नाही. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी आज शिवसेनेकडून दिवाळीच्या शिध्याचे शेकडो ट्रक रवाना करण्यात आले आहेत. दसरा मेळाव्याच्या ठिकाणाहूनही आणखी ट्रक सोडले जातील. आमचे पदाधिकारी आणि शिवसैनिक घरोघरी जाऊन ही मदत पोहोचवतील,” असे ते म्हणाले. मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसैनिक घेतील गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त भागात थांबून शेतकऱ्यांना मदत करावी आणि सरकारी पंचनामे योग्य प्रकारे करून घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुलांच्या फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, अत्यंत महत्त्वाचा दिलासा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “काही शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलींच्या ठरलेल्या लग्नाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांना आम्ही आश्वस्त केले आहे की, मुलींच्या लग्नाची चिंता करू नका. त्या त्या भागातील शिवसैनिक या लग्नांची जबाबदारी घेतील आणि त्याचे पूर्ण नियोजन करतील.” ——————- हेही वाचा.. 42 अंश उन्हातही मुंडे परिवारावरील प्रेम दिसले!: दुष्काळात शेतकरी, शेतमजूर-ऊसतोड मजुरांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर!; भगवान भक्तीगडावरून धनंजय मुंडेंची ग्वाही
“संतश्रेष्ठ भगवान बाबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची पावन परंपरा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर जपली आणि मुंडे साहेबांनंतर हीच परंपरा आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत. आज ऑक्टोबरच्या या तळपत्या उन्हात आणि तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानातही लाखो माय-माऊली, तरुण आणि शेतकरी भगवान भक्तिगडावर दाखल झाले आहेत. यावरून मुंडे परिवारावर जनतेचे किती अथांग प्रेम आहे हे स्पष्ट होते. आज संपूर्ण महाराष्ट्रावर आणि विशेषतः बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे भीषण सावट आहे. या संकटकाळात शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडणार नाही; महायुती सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील,” असा ठाम विश्वास आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *