![]()
सिल्लोड तालुक्यातील पहिल्या आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंप्री येथे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता बनकर, उपसभापती भगवान आहेर व पंचायत समिती सदस्य सुमित्रा सुदाम बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच पिंप्री येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झाल्याने त्यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. यात प्रदीप पुंडलिक काकडे याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अधिकारी पदावर, पोलिस दलात पल्लवी सुनील सिरसाट व प्रतीक्षा आत्माराम शिंदे (सिरसाट) तर होमगार्ड दलात शिवानी सदाशिव सिरसाट तर जवाहर नवोदय विद्यालयात कल्याणी संदीप सुरडकर यांची निवड झाल्याने यांचा सत्कार सोहळा झाला. याच कार्यक्रमात इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही आयोजित करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेच्या विविध मागण्यांचे निवेदन मान्यवरांना देण्यात आले व मागण्यांची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असे आश्वासित करण्यात आले. भाजप नेते सुरेश बनकर, भाजप जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, सुदाम बनसोड, गटशिक्षणाधिकारी ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव फुसे, सिल्लोड केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव बडक, केंद्रीय मुख्याध्यापक किशोर जगताप, पत्रकार हरिदास खंबाट, साहेबराव आहिरे, ग्रामपंचायत अधिकारी नितीन राठोड, उपसरपंच भागाबाई सिरसाठ, शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामेश्वर लोखंडे आदी उपस्थित होते.
Source link
पिंप्री शाळेत गुणवंत विद्यार्थी, नूतन सभापती-उपसभापती यांचा सत्कार:सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप, मान्यवरांची उपस्थिती