![]()
भारतीय चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रेखा आणि हेमा मालिनी या लोकप्रिय अभिनेत्यांवर चित्रित झालेल्या सुमधुर गीतांची “कारवाँ सितारो का“ ही संगीत मैफिल ३२व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात नवरात्रौच्या दसऱ्याच्या दिवशी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगली. या कार्यक्रमच्या संयोजिका व मुख्य प्रख्यात गायिका पल्लवी पत्की ढोले, रफी हबीब, विनोद नरवडे, इरफान, कविता जवळेकर या गायिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुघ्ध केले. या कार्याक्रमचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले. आज की रात, जाइए आप कहाँ, आवारा हूँ, प्यार करने वाले, सावन का महीना, चुरा लिया है दिल को, हवा के साथ साथ, रूप तेरा मस्ताना, दिवाना हुआ बादल, हे अपना दिल, प्यार हुआ इकरार , ये चाँद सा रोशन, सलामे इश्क मेरी जान, छुप गये सारे नजारे, निगाहें मिलाने को जी, तेरे जैसा यार कहाँ, कजरा मोहब्बत वाला, जय जय संतोषी माता अशा असंख्य गीतांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक गाण्यांना वन्स मोरही मिळाला. संजय हिवराळे (ऑक्टोपॅड), अमन सय्यद (कीबोर्ड), अमर वानखेडे (कीबोर्ड), सचिन वाघमारे (फ्लूट), मुकेश धोत्रे (लाईव्ह ड्रम), महेश रिसवडकर(गिटार), अंकुश बोर्डे (ढोलक), महेंद्र कुमार (सेक्सोफोन) ह्यांनी वाद्यसांगत केली. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी कलाकारांचा सत्कार केला. दरवर्षी पुणे नवरात्रौ महोत्सवाचा समारोप ‘कभी अलविदा ना केहना’ या गीताने केला जातो. यावेळी मंचावरील सर्व कलावंत, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्रेक्षकांनी एकत्रित ‘कभी अलविदा ना केहना’ हे एकत्र गाणे गायिले आणि भावपूर्ण वातावरणात ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची सांगता झाली. या प्रसंगी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हेमंत बागुल, सागर आरोळे आदि उपस्थित होते. घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.
Source link
पुणे नवरात्रौ महोत्सवाची 'कारवाँ सितारो का' कार्यक्रमाने सांगता:दिलीप कुमार, राज कपूरसह लोकप्रिय अभिनेत्यांवरील गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले