Headlines

श्रीनगरमध्ये दसरा उत्सव साजरा, सामाजिक सलोख्याचे दर्शन:पुनीत बालन ग्रुपच्या मदतीने शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर सोहळा, विविध धर्मांचे नागरिक सहभागी




धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश देणारा दसरा उत्सव श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर उत्साहात साजरा करण्यात आला. काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात काश्मिरी पंडितांसह हिंदू, मुस्लिम, शीख समाजातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध समुदायांतील नागरिकांच्या सहभागामुळे उत्सवातून सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहअस्तित्वाचे दर्शन घडले. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने परस्परांच्या श्रद्धा आणि परंपरांचा सन्मान राखण्याचा संदेश देण्यात आला. धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नता बाजूला ठेवून नागरिकांनी एकत्र येत काश्मीरच्या सामायिक सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. या उत्सवाच्या आयोजनासाठी पुनीत बालन यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे सोहळ्याचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी काश्मिरी पंडित संघर्ष समितीने श्रीनगर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन, श्रीनगर महानगरपालिका, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे आभार मानले. क्रिकेट असोसिएशनने मैदानासह आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. माणुसकीचा धागा सर्वांना जोडणारा ‘काश्मीरमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने विविध धर्मांतील नागरिकांनी एकत्र येणे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरांचे प्रतीक नसून, माणसांना जोडण्याचे आणि परस्परांमधील विश्वास दृढ करण्याचे माध्यम आहेत. धर्म, भाषा आणि संस्कृती वेगवेगळ्या असल्या, तरी माणुसकीचा धागा सर्वांना एकत्र जोडतो. काश्मीरमध्ये शांतता, बंधुभाव आणि सहअस्तित्वाची भावना अधिक दृढ व्हावी,’ अशी अपेक्षा पुनीत बालन यांनी व्यक्त केली. काश्मीरमधील विविध समुदायांमध्ये परस्पर आदर आणि विश्वास वाढविण्यासाठी अशा सामूहिक उत्सवांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे आयोजकांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *