![]()
‘लहान मुलांना कपडा लागतो कितीसा, मग भाव एवढे वाढले कसे?’ हा प्रश्न आजकाल शहरातील प्रत्येक पालकाच्या तोंडावर आहे. बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे आजकाल लहान मुलांचे (विशेषतः ० ते ६ वर्षे वयोगटातील) कपडे मोठ्यांच्या कपड्यांइतक्या दरांत विकले जात आहेत. साध्या क
.
शहरातील कापड बाजार, नवी पेठ, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी परिसर, गुलमोहोर रोड, पाइपलाइन रोड परिसर आणि शहरातील नामांकित मॉल्समध्ये लहान मुलांच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी पालकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, सध्या १ ते ५ वर्षांच्या बालकाचा एखादा कुर्ता-पायजामा, जिन्स किंवा फ्रॉक घ्यायचा झाल्यास थेट ८०० ते १८०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत.
आजकाल १ ते ५ वर्षांच्या बालकांसाठी डिझायनर कुर्ती, जीन्स, फ्रॉक आणि एथनिक वेअर यांना मोठी मागणी आहे. पालकांचा कल केवळ कपड्यांकडे नसून, मुलांच्या आरोग्याला मानवेल अशा दर्जेदार फॅब्रिककडे अधिक असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.
कपड्यांच्या गुणवत्तेमागील तांत्रिक बाजू लहान मुलांच्या कपड्यांची निवड करताना पालक आणि उत्पादक काही गोष्टींची काळजी घेतात: त्वचेची सुरक्षितता : लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते. यासाठी १०० टक्के मऊ कॉटन,नॉन-टॉक्सिक डाय केलेल्या कापडाचा वापर केला जातो, ज्यामुळे मुलांना आरामदायी वाटते. फिनिशिंग व सुरक्षितता : छोट्या आकाराच्या कपड्यांवर बारीक कारीगरी, मऊ बटणे आणि स्किन-फ्रेंडली झिप बसवण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते, ज्यामुळे कपड्यांचा दर्जा उंचावतो.
कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा विचार करावा लागतो ^लहान मुलांची वाढ वेगाने होते. त्यामुळे अवघ्या ५ ते ६ महिन्यांत हे महागडे कपडे त्यांना लहान होतात. परिणामी, वारंवार नवीन कपडे खरेदी करावे लागतात. यामुळे सण-उत्सव किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च थेट कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा विचार करावा लागत आहे. – पायल शिंदे, पालक