Headlines

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात स्पायकॅम पेनद्वारे पैसेवाटप:लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे प्रकार खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे




पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपिकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे आणि मतदान झाल्यानंतर तो व्हिडिओ दाखविल्यावर ठरलेली रक्कम दिली जात आहे, असा प्रकार सुरू असल्याची माहिती मतदार देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे. ‘सुप्रियाताईंनी तो स्पाय पेन मला नक्की पाठवावा’ पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यासाठी ‘स्पाय पेन’चा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनीकेला होता. या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्पाय पेन म्हणजे नेमके काय आणि तो कसा असतो, हे सुप्रियाताईंनी मला जरूर पाठवून द्यावे. म्हणजे तो स्पाय पेन काय असतो आणि नेमके काय चालले आहे, हे मी निश्चितपणे समजून घेईन. हे आहेत प्रमुख उमेदवार हे ही वृत्त वाचा अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?:फॉरेन्सिक चौकशीतून सत्य बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, स्पाय पेनवरून सुप्रिया सुळेंना टोला राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, पुण्यात भाजपकडून ‘स्पाय पेन’चा वापर होत असल्याच्या आरोपांवरून त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *