Headlines

आमच्याच गाडीवर दगडफेक अन् आमच्यावरच गुन्हे का?:मनसे-शिवसेना वाद वाढवायचा नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बांधील- संजय निरुपम




इंदौरी चाटचा जो हलवाई आहे त्याने माझ्याविरोधात बोंबाबोंब केली. पोलिसांवर दबाव आणला की माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली तर ती चुकीची आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केल्याने त्यांच्यावर कारवाई केली ती योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे संजय निरुपम यांनी मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज काय आहे? माझ्या गाडीवर दगडफेक झाली त्यासाठी आमच्याच माणसांवर गुन्हा दाखल करतात का? असा सवाल शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. मी राम यादव यांना सांगितले की त्या परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक राहतात त्यांच्याशी आपण संवाद साधू. त्यांनी पोलिसांना बैठकीबद्दल माहिती दिली होती. मी लढणारा माणूस संजय निरुपम म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये असताना राज ठाकरे यांच्याबद्दल काय काय बोललो हे सर्व काही सोशल मिडीयावर आहे. पण मला हा विषय वाढवायचा नाही. मी गोर-गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस आहे.मनसेच्या लोकांनी माझ्याविरोधात घोषणाबाजी केल्याने मी काही थांबणार नाही. मी लढणारा माणूस आहे, मी या विषयाला पुढे घेऊन जाणार आहे. यापुढेही मी ऑटो आणि टॅक्सी चालकांनी बैठक घेणार आणि त्यांची भूमिका काय ते समजून घेणार, सरकारची भूमिका त्यांना समजून सांगणार. कोणाचा रोजगार जावू नये संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने 1 मे 2026 पासून राज्यात रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक केली आहे. यामध्ये त्यांची एक परीक्षा घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्यांना मराठी आली नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. माझा केवळ इतकाच विरोध होता की कोणाचा रोजगार जावू नये. हे सर्व लोकं गरीब आहे, ते ऑटो-टॅक्सी चालवत आपले कुटुंब चालवतात. या अनुषंगाने मी मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की पुढच्या आठवड्यात यावर चर्चा करणार आहोत. मनसे-शिवसेना वाद नको संजय निरुपम म्हणाले की, यानंतर मी विचार केला की आपण ऑटो-टॅक्सी चालकांची भेट घेत त्यांना सांगावे सरकार तुमच्यासोबत आहे. काळजी करू नका. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार नाही हे सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो. यावेळी मनसेच्या लोकांनी माझ्याविरोधात घोषणाबाजी केली, मला शिवीगाळ केली. मला पण शिवीगाळ करता आली असती पण मला शिवसेना आणि मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही. शेवटी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांशी बांधील आहोत. मराठी लोकांसाठी लढले पाहिजे हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही काम करत असतो. त्यामुळे मला वाटते की मनसे-शिवसेना वाद होऊ नये. संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक मराठी भाषा बोलता-लिहिता येणार नाही अशा रिक्षाचालकांवर 1 मेपासून दंडात्मक तसेच परवाना निलंबन व रद्दची कारवाई केली जाईल, असा निर्णय शिंदेसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दहा दिवसांपूर्वी घेतला. त्याला शिंदेसेनेचेच नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी विरोध केला. त्यांनी मुंबईतील हिंदी भाषिक तसेच रिक्षाचालकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला. दुसरीकडे 15 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला. यातील मराठी मतांचे गणित लक्षात घेऊन मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, ‘भय्यांना’ मुंबईबाहेर काढण्याची हीच वेळ आहे. एवढेच नव्हे तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर येथे निरुपम यांच्या गाडीवर दगडफेकही केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *