Headlines

मराठी मुलांना जेल अन् 'भैय्या' निरुपमला सुरक्षा?:रिक्षाचालक मराठी शिकायला तयार, मग संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय?- संदीप देशपांडे




संजय निरुपमसारख्या भैय्याला मराठी पोलिस का पाठिंबा देतात हे न उमजण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत त्यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे, त्यांच्या विचारांचे सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैय्या निरुपमला पाठिंबा देणारे हे कोणते सरकार आहे? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्याच्यावर काही कारवाई करण्यात येत नाही. उलट त्याला सुरक्षा देत वापस पाठवतात. आणि मराठी मुलांना जेलमध्ये टाकतात? हे नक्की बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे का? संजय निरुपम आणि पोलिस खात्याला माझे सांगणे आहे की अशी जोर जबरदस्ती केली तर याचा उद्रेक मुंबईभर होईल, असा इशाराच देशपांडे यांनी दिला आहे. बागेश्वर महाराजांना अक्कल नाही संदीप देशपांडे म्हणाले की, बागेश्वर महाराज याला काही अक्कल नाही. तो वेडा माणूस आहे. ते काही इतिहास तज्ञ नाहीत. त्यांच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. त्याचा काही अभ्यास नाही. बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे का नाही हे बघणं गरजेचे आहे, रस्त्यावरचा वेडा काहीही बोलतो त्यावर आपण चर्चा करायची का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. ..तर दिघे साहेबांनी कानाखाली मारली असती संदीप देशपांडे म्हणाले की, आज जर दिघे साहेब असते तर त्यांनी संजय निरुपम यांच्या कानाखाली मारली असती. पण दिघे साहेब नाहीत तर एकनाथ शिंदे यांनी यांनी तरी मारावी. काल अनेक उत्तर भारतीय रिक्षा आणि टॅक्सी चालक आमच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटले त्यांचे म्हणणे आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा, मराठी सक्तीवरुन जर ऑटो-टॅक्सी चालकांना काही अडचण नाही तर संजय निरुपम यांना काय अडचण आहे? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. संजय निरुपम आणि शंशाक राव यांनाच अडचण आहे. 15 लोकंही संपावर जाणार नाही संदीप देशपांडे म्हणाले की, 1960 पासून मराठी शिका हे प्रेमाणे सांगत आहोत. अजून किती प्रेमाणे सांगणार? छडी लागे छम छम विद्या येई घम घम ही मराठीतली म्हण आहे. प्रेमाणे सांगितले तो पर्यंत तु्म्ही शिकत नाही. आम्ही पोट भरण्यासाठी मराठी शिकायला तयार आहे असे अनेक रिक्षा चालकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. डीसीपीनी सांगितले की संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईला वेठीस कोण धरू शकतो हे आम्हाला पाहायचे आहे. भैय्यामध्ये एवढी ताकद आली आहे का? 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार नाही. सरनाईकांनी विषय सोडू नये संदीप देशपांडे म्हणाले की, तुम्हाला कायद्याचे पालन करायचे नसेल तर इथून निघून जा. तुमच्याकडे रोजगार मिळत नसल्याने तुम्ही इकडे आले आहात. अटक करायची असेल तर ती आम्हाला केली जाते भैय्या लोकांना पोलिसांनी सुट दिली आहे. प्रताप सरनाईक यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. हा विषय मध्येच सोडू नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *