![]()
संजय राऊत जनतेने तुम्हाला कचऱ्याचा डब्बा म्हणून वापरले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी आणि राहुल गांधी हे तुमचा वापर कचऱ्याचा डब्बा म्हणून वापर करतात. तुमची काय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात उबाठाला कोणीही वापरते आणि फेकून देते, अशी डब्बासारखी अवस्था झाली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राघव चड्डा आणि इतर 7 खासदार जोपर्यंत आप आणि इंडिया आघाडीसोबत होते तो पर्यंत ते नेते होते आणि आता त्यांनी तुमची साथ सोडली तर ते पेज 3 चे नेते झाले का? असा सवाल बन यांनी केला आहे. त्यांना जनतेमध्ये काही किंमत नाहीअसे सांगता. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत होते तेव्हा ते दिघे साहेबांचे कार्यकर्ते होते पण त्यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतली तेव्हा त्यांच्यावर केलेले आरोप महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. संजय राऊत म्हणजे दुःशासन नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत यांनी भजपचा उल्लेख बकासूर असा केला आहे. ते आता महाभारतामध्ये गेलेच आहे तर त्यांना इतकेच सांगायचे आहे तुम्ही दुर्योधानासोबत दुःशासनच्या भूमिकेत आहात, त्यांनी इतरांवर टीका करू नये. दुःशासन ज्या पद्धतीने वागला त्याच पद्धतीने राऊत वागत आहेत. ज्यांचे नाव राघव आहे ते दुर्योधन आणि दुःशासनासोबत राहणार नाहीत, ते पांडवासोबत राहतील. ज्यांच्यासोबत धर्म आहे त्यांच्या सोबत देव आणि पांडव असतात. चड्डा यांनी इकडे प्रवेश केला कारण त्यांना अहंकारी लोकांसोबत राहायचे नव्हते. तुम्ही पैसा लुटल्याने जेलवारी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे काही देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जेलमध्ये गेले नव्हते. तुम्हाला लोकांना लुटल्याने जेलमध्ये जावे लागले. भाजप कधीही दबावाचे राजकारण करत नाही. तसे असते तर सर्वात पहिले तुम्हाला पक्ष बदलावा लागला असता. तुम्ही जेलमध्ये गेलात कारण तुम्ही मराठी माणसांचे घरे लुटली, पत्राचाळीत मराठी माणसांना बेघर करत स्वत:चे खिसे भरल्याने तु्म्हाला जेलमध्ये जावे लागले. दबावाचे राजकारण केले असते तर तुम्हाला प्रवेश करावा लागला असता. म्हणून शिंदेंनी तुमची साथ सोडली नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत भाजपने तुमचा विनयभंग केला नाही, महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले की तुम्हाला अब्रु नाही. तुमची औकात काय हे जनतेने दाखवून दिले. भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आवाहन केले नव्हते. तुम्ही हिंदुत्व सोडल्याने, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याने एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेना आणि भाजपची युती करण्याचा निर्णय घेतला.
Source link
संजय राऊत म्हणजे दुर्योधनाच्या दरबारातील 'दुःशासन'!:'उबाठा'ची अवस्था वापरून फेकून देणाऱ्या डब्यासारखी- नवनाथ बन