Headlines

500 कोटींच्या क्लिपवरून महायुतीत वादाची ठिणगी:रामदास कदमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 'शांत' राहण्याच्या सूचना




मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या 500 कोटींच्या कथित देवाणघेवाणीच्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या एका क्लिपमुळे सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मित्रपक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. या प्रकरणावरून महायुतीमधील राजकीय वातावरण तापले असतानाच, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात मध्यस्थी केली आहे. शिंदे यांनी रामदास कदम यांना या विषयावर आणखी कोणतेही भाष्य न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी आणि मित्रपक्षांमधील कटुता कमी करण्यासाठी शिंदे यांनी तातडीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. रामदास कदम यांचे प्रसाद लाड यांच्यावर आरोप रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो दाखवत त्यांच्यात मैत्री असल्याचा दावा केला. तसेच, भाजपवर मित्रपक्षाला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपचे नेते तीव्र नाराज झाले असून, दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. रामदास कदम पक्षात एकाकी? रामदास कदम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मित्रपक्षाकडून होत असलेल्या कटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी कदमांवर जोरदार टीका केल्यानंतरही मंत्री उदय सामंत वगळता शिवसेनेच्या एकाही नेत्याने त्यांना पाठिंबा दिला नाही. इतर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केवळ क्लिपच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम सध्या पक्षातच एकटे पडल्याचे चित्र आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर रामदास कदम यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये वरवर जरी समन्वय दिसत असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात मान-अपमानाची मोठी लढाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्येही हाच विसंवाद पाहायला मिळाला होता, असे अनेक नेते खासगीत मान्य करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *