Headlines

मेळघाटात मका खरेदीसाठी 22 केंद्रांची मागणी:शासनाने 2410 रुपये दर निश्चित केला, सध्या अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलने विक्री सुरु




अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि मेळघाट तालुक्यांमध्ये यंदा मक्याचे पीक चांगले आले आहे. मात्र, शासकीय खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बहुतेक शेतकरी अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मका विकत आहेत. शासनाने मक्यासाठी २,४१० रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित केली आहे. सध्या बाजारात अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी, हा दर जास्त काळ टिकणार नाही अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे मेळघाटात २२ ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सावकारांकडून घेतलेले पैसे फेडण्यासाठी मका व्यापाऱ्यांना विकत आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किमान आधारभूत किंमत ३ हजार रुपये प्रतिक्विंटल करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *