Headlines

10 किलो पनीर नष्ट, 115 किलो मसाला जप्त:अन्न व औषध प्रशासनाची अमरावतीत कारवाई; सणासुदीमुळे मोहीम, 5 नमुने घेतले




अमरावतीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी या मोहिमेअंतर्गत १० किलो विनालेबल पनीर नष्ट करण्यात आले. तसेच, ११५ किलो धनीया आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली. ही कारवाई मेसर्स कन्हैय्या दूध डेअरीतून करण्यात आली, जिथे संशयास्पद पनीर मिळाले. इतवारा बाजारातील मेसर्स आहूजा फ्लोअर मिलमधून २९ हजार ९८० रुपये किमतीचा मसाला जप्त करण्यात आला. हा साठा कमी दर्जाचा असल्याचा एफडीएला संशय आहे. कोजागिरी पौर्णिमेमुळे दुधाची मागणी वाढल्याने चार डेअरींची तपासणी झाली. याशिवाय, तीन मसाल्याच्या दुकानांचीही तपासणी करण्यात आली. एकूण ५ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सहायक आयुक्त विनय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, वि. दा. घोंगे, श्रीमती देशमुख आणि अ. ग. चौहाण यांनी ही कारवाई केली. अहवाल आल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *