![]()
म.रा. हिवताप विभाग अन्यायविरोधी संघर्ष समितीने हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या प्रतिनिधीमंडळाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांची मेळघाट दौऱ्यावर असताना भेट घेतली. आरोग्य पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीची प्रकरणे गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहेत. १६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयामुळे नियुक्ती प्राधिकारी बदलल्याने ही पदोन्नती थांबली आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट २०२६ रोजी आरोग्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप निर्णय नाही. आयुक्तांनी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. विनंती बदल्यांमधील अन्याय दूर करणे, आरोग्य निरीक्षक पदावरील पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, क्षेत्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे आणि त्यांना बायोमेट्रिक हजेरीतून सूट देणे या मागण्याही मांडण्यात आल्या. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगतीचा दहा, वीस, तीस वर्षांचा लाभ सेवानिवृत्त आणि नियमित कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याची मागणीही करण्यात आली. आयुक्तांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.
Source link
हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित:आरोग्य आयुक्तांना निवेदन देत मागण्या मार्गी लावण्याची मागणी, आयुक्तांचे कार्यवाहीचे आश्वासन