![]()
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एकअसलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्याशारदीय नवरात्रोत्सवात ऑनलाइनदर्शनालाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे.मंदिर संस्थानने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन दर्शन सुविधेमुळे भारतासहब्राझी
.
ऑनलाइन दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये पुण्यातील ८ टक्के, मुंबईतील ५ टक्के, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमधीलप्रत्येकी ४ टक्के भाविकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, अमरावती, ठाणे या शहरांतील प्रत्येकी ३टक्के भाविकांनी ऑनलाइन दर्शन घेतले. परदेशात ब्राझील, अमेरिका, यूएई,इंडोनेशिया येथील प्रत्येकी १ टक्का भारतीय भाविकांनी ऑनलाइन दर्शन घेतले. वयोगटानुसार ऑनलाइन दर्शन घेणाऱ्यांमध्ये२५ ते ३४ वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४३टक्के भाविक आहेत.
१. मिरजचे ओंकार भेंकी सध्या अमेरिकेतआहेत. अंतरामुळे तुळजापूरला येता आलेनाही. मात्र ऑनलाइन दर्शनाच्यामाध्यमातून त्यांना श्री तुळजाभवानी मातेचेदर्शन घेता आले. या सुविधेमुळे मनालासमाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्तकेली.
२. तुळजापूरचे इंद्रजित कदम सध्याअमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहेत.आपल्या गावातील आराध्य देवीच्यादर्शनासाठी प्रत्यक्ष येणे शक्य झाले नाही.ऑनलाइन दर्शनामुळे तुळजाभवानी मातेचेदर्शन घेता आले याचा आनंद आणिआत्मिक समाधान त्यांनी व्यक्त केले.
३. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातीलबांबवडे येथील विक्रांत पवार सध्या दुबईतआहेत. तुळजापूरला प्रत्यक्ष जाणे शक्यनसल्याने त्यांनी ऑनलाइन तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दूरदेशी असतानाहीदेवीचे दर्शन घेता आल्याने आत्मिकसमाधान लाभल्याची भावना त्यांनीपोस्टमधून व्यक्त केली.
देशासह विदेशातही तुळजाभवानीचे भक्त
तुळजाभवानी मातेच्या भक्तांचा विस्तारदेशाच्या विविध भागांत आहे. परदेशातहीआहे. ब्राझील, अमेरिका, संयुक्त अरबअमिराती आणि इंडोनेशिया या चारदेशांतील प्रत्येकी १ टक्का भाविकांनीऑनलाइन दर्शन घेतल्याची माहिती समोरआली आहे. परदेशात राहणाऱ्याभारतीयांना प्रत्यक्ष तुळजापूरला येणे शक्यनसले तरी ऑनलाइन माध्यमातून देवीशीजोडण्याची संधी मिळाली.