Headlines

देशातील प्रमुख तीर्थस्थळांना ‎पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न:रेल्वे मंडल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्या जनसंवादाचे आयोजन




श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना माफक दरात आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी रेल्वेने जोडण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचे मंडल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांनी दिली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात उपस्थित नागरिक आणि प्रवाशांनी रेल्वेच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर डॉ. मिश्रा यांनी प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या सूचना आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. प्रवाशांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्या अपेक्षांनुसार रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करणे, तसेच रेल्वे प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करणे, हा या जनसंवाद कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजीत मिश्रा यांनी उपस्थित नागरिक आणि प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधला. रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, विविध सेवांबाबतच्या अपेक्षा आणि आवश्यक सुधारणांविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. त्यामुळे हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र देशातील प्रमुख तीर्थस्थळांशी रेल्वे मार्गाने जोडले जाणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आणि प्रवास अधिक सुखकर होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमातून प्रवाशांच्या अपेक्षा आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत झाली असून रेल्वे प्रशासनाने यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. प्रवाशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतानाच रेल्वे सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि अभिप्रायही त्यांनी जाणून घेतले. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही त्यानी यावेळी सांगीतले. या या कार्यक्रमास झोनल रेल्वे कन्झ्युमर कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य प्रणव परिचारक, ग्राहक मंचाचे अध्यक्ष शशिकांत हरिदास, मुख्य वाणिज्य निरीक्षक अमोल जोशी, स्टेशन प्रबंधक के. के. मिश्रा, अंकित सिंग, आरपीएफ प्रमुख सुहास जाधव, रमेश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *