![]()
कर्णपुरा यात्रेतील रंग, परंपरा, श्रद्धा आणि जनजीवन आपल्या कॅमेऱ्यातून टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या कलाकृतींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर फोटोग्राफर्स असोसिएशन व ‘कलर ऑफ संभाजीनगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कर्णपुरा फोटो वॉक’ प्रदर्शनाला नागरिकांनी मोठी पसंती दर्शवली. दसऱ्याच्या मुहूर्तावर क्रांती चौक उड्डाणपुलाखाली आयोजित या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, स्पर्धेचे परीक्षण आणि पारितोषिक वितरण महापौर समीर राजूरकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या फोटो वॉक प्रदर्शनात 20 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला असून, पोर्ट्रेट, हॅपिनेस आणि स्पीड या विषयांवरील 100 उत्कृष्ट छायाचित्रे मांडण्यात आली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परीक्षण करून विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. अशा फोटो प्रदर्शनाची शहराला गरज- महापौर महापौर राजूरकर म्हणाले की, अशा फोटो प्रदर्शनाची शहराला गरज असून असे वेगवेगळे विषयावर प्रदर्शन भरल्यानंतर शहरातील दस्तावेज व शहरात असलेल्या वेगवेगळ्या विषयाची माहिती लोकापर्यंत पोहोचते. प्रदर्शनातून छायाचित्रकार मोठे होतात- पोलिस आयुक्त यावेळी पोलिस आयुक्त पवार म्हणाले छायाचित्र खूप उत्कृष्ट होते. परिक्षण करताना आम्हाला खूप विचार करावा लागला. अशा प्रदर्शनातून छायाचित्रकार मोठे होतात. असोसिएशनचे नाव बदलले यावेळी औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशनचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर फोटोग्राफर्स असोसिएशन” करण्यात आले व त्यासंबंधीचा लोगोचा अनावरण महापौर समीर राजूरकर व पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, मनपाचे सांस्कृतिक अधिकारी डॉ. सर्वेश नांद्रेकर असोसिएशन अध्यक्ष किशोर निकम, कोषाध्यक्ष सतीश साखरे, ज्ञानेश्वर पाटील, रमेश रावळे, नाना माकुडे, राजेश गोकलानी हे उपस्थित होते. या छायाचित्र स्पर्धेचा निकाल प्रथम विकास सोळंके, द्वितीय संकेत कुलकर्णी, तृतीय शुभम काळे, उत्तेजनार्थ अनिकेत गोजे व अजय राठोड यांना पारितोषिक मिळाले. यावेळी छायाचित्र प्रदर्शनाला सहकार्य करणारे आकाश पारख, सुनील पांडे, राजेश गोकलानी, रोटरीचे शाहेद शेख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश रावळे यांनी केले.
या वेळी अध्यक्ष किशोर निकम, कोषाध्यक्ष सतीश साखरे, ऋषिकेश होशिंग, विजय लकडे, ज्ञानेश्वर पाटील, संजय चुबे, रमेश रावळे, नाना माकुडे, आनंद काळे, राजेश गोकलानी, नितीन शेजुळ, देवळानकर भगिनी, शैलेश सांगोले, मंगेश जोशी, राजेश विडेकर, अजिंक्य भोरटखंडीकर, अजय राठोड, संजीत नागपुरकर, शुभन काळे,अनीकेत गोजे, शुभम पडघन, श्रीपाद पाठक, शुभम सरसंडे यांनी सहकार्य केले.
Source link
कर्णपुरा यात्रेच्या रंगांनी उजळले क्रांती चौक:फोटोग्राफर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला नागरिकांचा भव्य प्रतिसाद, असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण