![]()
अमरावती शहरातील लेखुमल मिठाई चौकात रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. दोन महिन्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. हा महत्त्वाचा चौक असल्याने मोठी वर्दळ असते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचा अंदाज चुकत असल्याने अपघात घडत आहेत. खड्डा चुकवताना वाहने एकमेकांवर आदळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा खड्डा जुना असून, काही दिवसांपूर्वी तो बुजवला होता. पण तकलादू कामामुळे काँक्रीट उखडले आहे. आता त्यातील सळ्या बाहेर आल्याने धोका वाढला आहे. दुरुस्ती होईपर्यंत बॅरिकेटींग आवश्यक आहे. नागरिकांनी तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाची भूमिका तयार केली आहे.
Source link
अमरावतीच्या लेखुमल चौकात रस्त्यात मोठा खड्डा, अपघातांचा धोका:दोन महिन्यांपासून दुर्लक्ष, तकलादू दुरुस्तीमुळे सळ्या बाहेर; नागरिक संतप्त.