Headlines

चांदूर रेल्वेमध्ये साई पुण्यतिथी महोत्सवासोबत समाजसेवेचा संदेश:धार्मिक कार्यक्रमांसोबत जलसंवर्धन, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा जागर




चांदूर रेल्वेच्या साईनाथ कॉलनी, साईनगर येथे साई पुण्यतिथी महोत्सव उत्साहात पार पडला. साई उत्सव समिती व ॐ साई भक्त परिवाराने आयोजित महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबत समाजप्रबोधन, जलसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा जागर झाला. श्री साईबाबांच्या अभिषेक व तीर्थस्थापनेने महोत्सवाची सुरुवात झाली. नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा, नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांच्यासह अनेक साईभक्त उपस्थित होते. महिला भजन, गायत्री यज्ञ, पालखी-दिंडी, साई आरती व भजनाचे आयोजन झाले. बाल कीर्तनकार शिवम महाराज पोटेकर यांच्या कीर्तनाने समारोप झाला. पालखी-दिंडीत साईभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पथनाट्याद्वारे ‘पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा’ हा जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी अभिनेता अनुज ठाकरे, अभिनेत्री अश्विनी ठाकरे, बाल कीर्तनकार शिवम महाराज पोटेकर, ठाणेदार मंगेश मोहोड, उद्योजिका प्रज्ञा बोडके, प्रदीप पटले (अंत्यसंस्कारात मदत) आणि अवयवदाते कलावटे कुटुंबीय यांचा सन्मान झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *