![]()
शेतात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी वनपाल जहीर सिराज शेख (वय ४७) याला अटक करण्यात आली. तो बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत करंजे येथे नियुक्तीस आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेली होते. ते नदीपात्रातील माती शेतात टाकत होते. वनपाल शेख याने हे काम बंद पाडले. संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाई करण्याची भीती दाखवली. काम सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराने विनंती केली. तेव्हा शेख याने स्वतःसह एका महिला सहकाऱ्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी चार हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले. ‘उर्वरित सहा हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नका’, असे त्याने सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर माळेगाव येथील ‘आयटीआय’समोरील एका उपाहारगृहात तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेख याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, वैशाली माकर, अविनाश चव्हाण यांनी ही कारवाई केली. —————— हेही वाचा.. टोरेंट कंपनी काय तुमची जावई आहे का?: भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडे संतापले, म्हणाले – झाडं कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होतो? कर्जत तालुक्यातील खांडस आणि भीमाशंकर अभयारण्यालगतच्या जंगलात ‘टोरेंट’ या गुजरातच्या कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः मैदानात उतरले असून, ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी या वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून, या सभेत ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर अत्यंत सडकून टीका केली आहे. सविस्तर वाचा
Source link
बारामतीत लाचखोर वनपालाला अटक:शेतकऱ्याकडून 6 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने पकडले