![]()
पुण्यातील लोणीकंद परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रोहिदास झोडगे (वय २९, रा. अभंगनगर, देहूगाव, पुणे, मूळ रा. कारंडी, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांचे भाऊ अण्णासाहेब (वय ३४) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद आळंदी-लोणीकंद रस्त्याने जात होते. फुलगाव परिसरात एका भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात झोडगे गंभीर जखमी झाले. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी झोडगे यांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक एन. गिरवलकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.आदित्य दशरथ ओैचरे (वय २२, रा. शिवनेरी पार्क, बालेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील मोकळ्या जागेत ओैचरे थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश भोईने यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून ओैचरे याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे सापडली. ओैचरे याने पिस्तूल का बाळगले? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक निरीक्षक अनिल केकाण, गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते यांनी ही कारवाई केली. ———– हेही वाचा.. बारामतीत लाचखोर वनपालाला अटक:शेतकऱ्याकडून 6 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने पकडले
शेतात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी वनपाल जहीर सिराज शेख (वय ४७) याला अटक करण्यात आली. तो बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत करंजे येथे नियुक्तीस आहे. सविस्तर वाचा
Source link